

वर्धा : यवतमाळकडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकवर कारने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन महिला डॉक्टरांसह एक जण जागीच ठार झाले. हा अपघात मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गावर झाला. डॉक्टर ज्योती क्षीरसागर, डॉक्टर फाल्गुनी, भरत क्षीरसागर अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.