

हिंगणघाट : येथून सहा किमी अंतरावरील त्या निवासी शाळेतील एक विद्यार्थी व॒ दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने आता बाधितांची संख्या ७८ वर पोहचली आहे. या निवासी शाळेतील 3० विद्यार्थी बुधवारी तपासणीत कोरोनाग्रस्त आढळले होते. ३९ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यावर गुरुवारी उर्वरित २४७ विद्यार्थी व 3० कर्मचाण्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील ४५ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने संख्या ७५ वर पोहचली. गुरुवारी शिप्र चाचणीत निगेटिव्ह आलेला संशवित एक विद्यार्थी व नऊ कर्मचाण्यांची चाचणी करण्यात आली. यात एक विद्यार्थी व दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने आता वसतिगृहातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७८ वर पोहोचली आहे.