पुलगाव व रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत आत्महत्येच्या दोन घटनांची नोंद! आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

वर्धा : पुलगाव येथील वल्लभनगर येथील मधुकर श्रीपंत गावड (वय 55) यांनी स्वत: च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पुलगाव पोलिसांनी सुमित गावड (वय 27) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

दुसरीकडे वर्धा येथील गजाननगर येथील रत्नाकर मुरलीधर ढोणे (वय 54) यांनी स्वत: च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नाकर यांना मद्यपान करण्याची सवय होती. मोठा भाऊ पद्माकर ढोणे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here