जिल्ह्यातील शेतकर्यांची पीकविम्याकडे पाठ! केवळ २७ हजार शेतकर्यांनी उतरविला विमा; वाईट अनुभवाचा परिणाम

राहुल खोब्रागडे

वर्धा : शेतकर्यांना पिकविम्याचा कोणताच लाभ मिळत नसल्या यावर्षी जिल्ह्यातील शेतकर्यांनी पिकविमा काढण्याकडे पाठ फिरवलेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी शेतकर्यांनी पिकविमा काढलेला आहे. यावर्षी जिल्ह्यातील केवळ २७ हजार सातशे सहासस्ठ शेतकर्यांनी पिकविमा उतरविलेला आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी घ्यावा याकरीता शासकीय यंत्रणेकडून जनजागृतीत करीत पीकविम्याचे महत्व पटवून देण्यात आले. मात्र पीकविम्याचा कोणताही लाभ जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळत नसल्याने शेतकर्यांनी पिकविमा काढण्याचे टाळले.
यावर्षापासुन पिकविमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरीता ऐच्छीक झाल्याने अनेक कर्जदार शेतकर्यांनी बँकांना पिकविमा काढण्यास नकार दिला ज्यांनी कर्ज उचल केली नाही अशा शेतकर्यांना सीएससी केन्द्रावर जावून हा पिकविमा काढायचा होता मात्र पिक विमा काढण्याकरीता जिल्ह्यातील शेतकरी उत्सूक नसल्याचे सर्वत्र दिसुन आले. थोड्याफार शेतकर्यांनीच सीएससी सेंटरवर जावुन विमा काढल्याचे सामोर आले आहे.
शासनाकडून खरीप व रब्बी पिकाकरीता पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येते या योजनेअंतर्गत जिल्हानिहाय वेगवेगळ्या इंशोरन्स कंपन्यांना नियुक्त करण्यात आलेल्या आहे. मात्र या कंपन्यांच्या जाचक अटिंमुळे शेतकर्यांचे नुकसान होवुनही त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई दिल्या जात नाही असाच आजपर्यतचा जिल्ह्यातील शेतकर्यांचा अनुभव असल्याने यावर्षी शेतकर्यांनी पिकविम्याकडे पाठ फिरविल्याचे सांगण्यात येत आहे.

……………………

पिकविम्यात व्यक्तीगत नुकसानभरपाई मिळत नसल्याची शेतकर्यांची शेतकरी ओरड करीत आहे. परिसरातील येखाद्या शेतकर्याच्या शेतातील पिकाचे वयक्तीक नुकसान झाल्यास इंशुरन्स कंपनी अशा शेतकर्यांना कोनताच लाभ देत नाही. परिणामी शेतकर्यांना परिसरातील दुष्काळ जाहीर होण्याची वाट पाहावी लागते शासनाकडुन तशी परिस्थीती जाहीर झाली तरच शेतकर्यांना नुकसानभरपाई दिल्या जाते त्यामुळे शेतकरी पिकविमा काढण्याकडे पाठ फिरवतात. त्यामुळे एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास त्या वाहनालाल ज्याप्रमाणे विम्याचा वयक्तीक लाभ मिळतो त्याचप्रमाणे एखाद्या शेतकर्याचे वयक्तीक नुकसान झाल्यास शेतकर्यांनाही त्याचा लाभ मिळावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here