आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही : नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

मुंबई : राज्यात एकीकडे करोना तर दुसरीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काही म्हटलं तरी चालेल, पण आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबूज्या म्हणणार नाही. ती आमची संस्कृती नाही असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

राज्यात सत्ता गेल्यापासून भाजपच्या नेत्यांना काही सुचत नाहीये. ते सर्व केंद्राच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडी सरकारला खाली पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. पण त्यांना यात यश येणार नाही असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी ही टीका केली आहे.

चंद्रकांत पाटलांनी आमच्यावर किती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तरी आम्ही त्यांना असं काहीही बोलणार नाही. आमच्यावर केलेल्या टीकेमुळे पेट्रोल-डिझेल, जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होणार असतील, लोकांना मोफत करोना लस मिळणार असेल आणि शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द होणार असतील तर त्यांनी खुशाल टीका करा. त्यांच्या टीकेचं स्वागतच आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here