भरधाव कार उलटली! चालकासह सहप्रवासी थोडक्यात बचावले; पुलगाव-रोहणा मार्गावरील अपघात

रोहणा : भरधाव कार अनियंत्रित होत उलटली. ही घटना रविवारी दुपारी पुलगाव-रोहणा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ घडली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारचालकासह वाहनातील सहप्रवासी थोडक्यात बचावले. पुलगावकडून रोहण्याकडे जाणारी एम. एच.०१ ए. ई. ९७४० क्रमांकाची कार रोहणानजीकच्या रेल्वे फटकाजवळ अनियंत्रित होत उलटली. यात चालकासह वाहनातील सहतप्रवाशांना किरकोळ इजा झाल्या.

अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्यात हातभार लावला; पण कारचालक व कारमधील सहप्रवासी घटनास्थळावरून लवकरात लवकर कसा पळ काढता येईल याच बेतात होते. अपघात झाल्यावर कारमधील एका तरुणाने त्याच्या मित्रांना फोन करून पाचारण केले. त्यानंतर अपघातग्रस्त कार इतर वाहनाच्या साहाय्याने ओढत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली; पण हे काम करीत असताना अपघाताची माहिती पोलिसांपासून कशी लपविता येईल,यासाठीच प्रयत्न झाल्याने अपघातग्रस्त कारचालकाच्या भूमिकेविषयी सध्या परिसरात उलट-सुटल चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here