अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी! पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : शिवीगाळ करण्यास हटकले असता दोघांनी महिलेस अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. सेवाग्राम येथील जुनी वस्ती परिसरात ही घटना घडली.

जुनी वस्ती परिसरात असलेल्या शासकीय विहिरीवर परिसरातील नागरिकांच्या मोटारी लागल्या आहेत. अजय ताकसांडे हा आला व त्याने शिवीगाळ करीत मोटारी काढण्यास सांगितले. दरम्यान, कमला मुंगले यांनी शिवीगाळ करण्यास हटकले असता अजय ताकसांडे आणि विशाल ताकसांडेयांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसात तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here