

राहुल खोब्रागडे
पवनार : येथील शेतकरी नारायण देशमुख यांनी आपल्या शेतातील दोन एकर पिकावर गुलाबी बोंड अळी आल्याच्या कारनावरुन या पिकावर नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला होता. याची माहिती कृषी विभागाला मिळताच कृषी विभागाची चमु शेतात पोहचुन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि यावर नियंत्रण आणता येत असल्याचे शेतकर्याला सांगत पिकावर नांगर चालविण्यापासुन थांबविले.
नारायण देशमुख यांची पवनार परिसरात पंधरा एकर शेती आहे त्यांनी पाच एकरात कपाशी पिकाची लागवड केली आहे त्यांनी पिकाची पाहणी केली असता त्यावर बोंड अळी आल्याचे त्यांच्या निदर्षनात आले. मागील वर्षीचा अनुभव पाहता त्यांनी या पिकावर नांगर चालविण्याचा निर्णय घेतला मात्र याची माहिती कृषी विभागाला मिळताच त्यानी शेतात येत पाहणी करुन शेतकर्याला मार्गदर्शन करीत पिकावर नांगर चालविण्यापासुन थांबविले.
कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. मात्र, कापाशीवर गुलाबी बोंडअळी व बोंडसड आल्याने शेतकरी हताश झाले आहेत. त्यामुळे कापसाचे पीकच ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून टाकण्याचा निर्णय शेतकर्याने घेतला. हाती येणारे पीक डोळ्यांदेखत गुलाबी बोंड अळीमुळे उद्धवस्त होत आहे. खरीप हंगामातील कापूस पिकावर शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात खर्च केला मात्र असे असतानाच अचानक कापूस पिकांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कापसाचे नुकसान होईल आणि हाती काहिच लागणार नाही या भितीने पिकावर नांगर चालविण्याच्या तयारीत शेतकरी होते. मात्र शेतकर्याला यापासुन प्रवृत्त करण्यास कृषी विभागाला यश आले.
यावेळी डॉ. विद्या मानकर, जिल्हा प्रकल्प संचालक आत्मा
कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी जे एम मडावी, कषी सहायक, सुनीता मुरार, कुणाल बुलकुंडे, तालुका व्यवस्थापक, प्रतीभा फुलझेले यांची उपस्थिती होती.
माझ्या शेतातील कपाशी पिकावर काही दिवसापुर्वी बोंडअळी आल्याचे पाहनित लक्षात आले होते. कापसावर अचानक गुलाबी बोंडअळी व बोंडसडचा प्रादुर्भाव झाल्याने २ एकरातील कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक काढून टाकण्याचा मी निर्णय घेतला होता मात्र कृषी विभागाच्या विद्या मानकर यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी करुन मला योग्य मार्गदर्शन केल्याने मी आता पिकावर नांगर चालविण्याचा विचार बदलला आहे.
नारायण देशमुख, शेतकरी, पवनार
शेतकरी कपाशीच्या पिकावर नांगर चालविनार असल्याची माहिती मिळताच प्रत्यक्ष पाहणी केली मात्र हा किरकोळ प्रादुर्भाव आहे. शेतकर्यांनी घाबरुन जाण्याच काही कारण नाही. काही प्राथमीक उपाययोजना केली तरी हा प्रादुर्भाव दुर होईल त्यामुळे पिकावर नांगर वगैरे फिरण्याचाच विचार कुणीही करु नये.
डॉ. विद्या मानकर, जिल्हा प्रकल्प संचालक आत्मा