इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा उपक्रम! बालकांचे मोफत आधारकार्ड

वर्धा : डाक कार्यालयामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे मोफत आधारकार्ड काढून देण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावस्तरावर पोस्टमनद्वारे ऑनलाइन आधारकार्ड काढण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. अंगणवाडीमध्ये नाव दाखल करण्यासाठी असो की, शालेय पोषण आहार मिळण्यासाठी बालकांना आधारकार्डची आावश्यकता भासते. लहान बालकांना तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाणे कठीण जाते. डाक कार्यालयामार्फत बालकांचे आधारकार्ड घरीच काढता यावेत, यासाठी पोस्टमनद्वारे निःशुल्क सेखा देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here