अवघ्या ५० रुपयांसाठी मित्राने केली मित्राची हत्या! लाकडी ठोकळ्याने केले गंभीर प्रहार

हिंगणघाट : अवघ्या ५० रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून वाद करून मित्रानेच मित्रावर लाकडी ठोकळ्याने जबर प्रहार करून त्याची हत्या केल्याची घटना हिंगणघाट येथील बीडकर वॉर्ड भागात शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सतीश प्रभाकर वरूलकर (४२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सतीश याने मित्र सचिन प्रभाकर पेंदाम (3२) याच्या पत्नीकडून ५० रूपये ऊधार घेतले होते अनेकवेळा मागणी करूनही सतीशने पैसे परत न केल्याने सचिनने शनिवारी ९ वाजेच्या सुमारास पैशाच्या कारणावरून वाद करून सतीशला लाकडी ठोकळ्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी सतीश याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने सुरुवातीला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ सेवाग्राम येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सचिन पेंदाम याच्याविरोधात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here