यंदाच वरीष लय धोक्याच रे बावा! माणसावर, जनावरावर ऐवढेच काय तर शेतमालावर सुध्दा केले असाध्य रोगाचे आक्रमण

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे): कोरोना नावाच्या रोगाने माणसाला, लम्पी रोगाने जनावराना तर ऐलो मोजा रोगाने सोयाबीन शेतमालाला वैतागुन सोडले आहे. यंदाचे वरीषच लय धोक्याच आहे र बावा! सर्व गावखेड्यातील मारोतीच्या पारावर, गोठानावर आणि गल्लीबोळात हिच चर्चा रंगताना कानी पडत आहे.
सन २०२० वर्षाला सुरवात झाली आणि जगभरात कोरोना नावाच्या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली. एक दोन महीने लोटते ना लोटते तर कोरोना भारतात दाखल झाला आणि आपला देश सुध्दा जगाप्रमाने जागीच थांबला. माणसा-माणसात दुराव्याची अनेक बंधने घातल्या गेली. अनेकाचा रोजगार, व्यवसाय कामधंदा बुडाला, आर्थिक संकट सर्वांन समोर उभे ठाकले. शहरात दिवसागनीक बांधीताची संख्या वाढु लागली पाहता-पाहता कोरोना गावखेड्यात दाखल झाला आणि एकच हाहाकार माजला. सर्व मानव जातीसमोर जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांचे आप्तजन या लाटेत परलोकवासी झाले. माणसापासून माणुसच दुर नेला. विशेष म्हणजे वर्षे संपण्यावर आले मात्र ही माहामारी काही थांबाचे नावच घेत नाही.
असाच काहीसा रोग मुक्या प्राण्यावर सुध्दा आला नाव त्यांचे “लम्पी” या रोगाने सुध्दा निम्या देशात हाहाकार माजविला पाहता-पाहता असंख्य जनावराना या रोगाने ग्रासले संसर्गजन्य असलेल्या या आजाराने जनावरा सोबत पशुपालक गोपालक शेतकरी सुध्दा बेजार झाले.
कृषी प्रधान भारत देशात असंख्याचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून मोठ्या कष्टाने शेतकरी शेतमालाचे उत्पादन घेतो. ग्रामीणच नाही तर शहराची सुध्दा अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या शेती व्यवसायात सोयाबीन या शेतपीकाला नगदी पीक म्हणून मोठी माण्यता आहे. यामुळे संपूर्ण देशात यांची मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते. मात्र यावर्षी बोगस सर्टीफाइड बियाण्यामुळे अनेक शेकर्याना दुबार-तिबार पेरणीला समोर जावे लागले. तर बोगस तननाशकामुळे दुबार तिबार फवारणीचा खर्च शेतकर्यावर बसला. मात्र शेतातील तन काही नाहीसे झाले नाही. ऐवढ्या अडचनीतुन कशीबशी वाटचोखळत शेतकर्यानी पीक जगविले मात्र यंदा सोयाबीन या पीकावर कधी न पाहलेला अॅलो मोजा नावाचा रोग आला आणि होत्याचे नोव्हते झाले. असंख्य शेतकर्याच्या शेतात याचा प्रादुर्भाव बघाला मिळाला. शेतातील उभी पिके वाळु लागले. कित्तेकांच्या शेतात सोयाबीन पीकाला शेंगाच लागल्या नाही. नगदी पीक म्हणून मोठी आस असलेल्या शेतकरी सोयाबीन पीकांने दगा दिल्याने पुर्ता हताश झाला असंख्य शेतकर्यानी उभ्या पीकात ढोर सोडली तर अनेकांनी रोटावेटर घुमवला अशा विदारक परिस्थितीच्या झळा संपूर्ण भागात पाहावयास मिळत आहे.
परिणामता सर्व गावखेड्यातील गावाच्या वेशीवर, मारोतीच्या पारावर, गोठानावर आणि गल्लीबोळात “यंदाचे वरीषच लय धोक्याच आहे रे बावा!” अशीच चर्चा कानी पडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here