वर्ध्यात कोरोनासह मृतकांच्या संख्येत वाढ : ११५ नवे रूग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर मृतांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी ५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या ७२ वर पोहचली आहे. गुरुवारी जिल्ह्यात एकूण ११५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात वर्धा तालुक्यात ६८ रूग्णांमध्ये ३८ पुरूष व ३० महिलांचा समावेश आहे. देवळी तालुक्यात ७ रूग्णांमध्ये ३ पुरूष व ४ महिलांचा समावेश आहे. सेलू येथील ५ रूग्णांमध्ये २पुरुष व ३ महिला आहेत. आर्वी ३, कारंजा १ पुरुष.आष्टीत ६ रुग्णांमध्ये ३ पुरुष व ३ महिला कोरोनाबाधित आढळले आहेत. समुद्रपूर तालुक्यात ११ रूग्णांमध्ये ९ पुरूष व २ महिलांचा समावेश आहे. हिंगणघाट तालुक्यात १४ रूग्णांमध्ये ९ पुरूष व ५ महिलांचा समावेश आहे. एकूण ११५ रूग्णांमध्ये ६६ पुरूष व ४९ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर जिल्ह्यातील २९८८ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहे. यातील १४७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर १४४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here