अवैध व्यवसायावर पोलिसांचे छापे! 5 जणांवर गुन्हे; वर्धा, हिंगणघाट येथे कारवाई

वर्धा : गत काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले आहे. अवैध जुगार, सट्टापट्टीचा व्यवसाय अनेक तरुण करीत आहेत. या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी वर्धा, हिंगणघाट येथे छापा टाकून 5 जणांवर गुन्हा दाखल केला. आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट पोलिसांनी चेतन गुप्ता (37) रा. शास्त्री वॉर्ड, हिंगणघाट या आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख असा एकूण 355 रुपयांचा मुद्देमाल तर हनुमान वॉर्ड येथील गफारखान मुन्नवर खान पठाण (71) या आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख असा एकूण 313 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वर्धा पोलिसांनी विद्यासागर वालदे (52) रा. अनंदनगर या आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख असा एकूण 2 हजार 590 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वर्धा शहर पोलिसांनी शहरातील तीन ठिकाणी गांजा व्यवसायिकांवर धाड टाकून गुन्हा दाखल केला. यात अमोल खडके (28), रा. बिदरगेटच्या या आरोपीकडून गांजा पिण्याचे साहित्य व रोख असा एकूण 41 रुपयांचा मुद्देमाल तर अमर ठाकरे (24) रा. गजानन नगर या आरोपीकडून गांजा पिण्याचे साहित्य व नगदी असा एकूण 41 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गजाननगर येथील करण धनपाल गोयल आरोपीकडून गांजा पिण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या आरोपीविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here