गांधीजींच्या स्मृती प्रित्यर्थ भरणारी पवनार येथील यात्रा रद्द! व्यावसायिक व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

पवनार, ता. ११ : येथे दरवर्षी महात्मा गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ १२ फेब्रुवारी रोजी धाम नदीच्या तिरावर ब्रम्हविंद्या मंदिर परिसरात भरविण्यात येणारी यात्रा यावर्षीही कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात जमावबंदी लागू असल्याने सलग दुसऱ्या वर्षीही यात्रा रद्द करण्यात आल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

महात्मा गांधी यांची ३० जानेवारी रोजी हत्त्या झाली त्यानंतर भुदान चळवळीचे प्रनेते आचार्य विनोबा भावे यांच्या नेतृत्वात देशभरातील सर्व सर्वोदयी कार्यकर्ते पवनार येथील ब्रम्हविंद्या मंदीर परिसरात एकत्र आले. महात्मा गांधींच्या हत्त्तेच्या तेराव्या दिवशी १२ फेब्रुवारीला धाम नदीपात्रात त्यांच्या अस्ती विसर्जीत करण्यात आल्या. गांधींच्या हत्तेनंतर सर्वोदयी कार्यकर्ते विनोबा भावे यांच्याकडे आशेने पाहु लागले होते. त्यांच्या नेतृत्वात ऐकत्रीत येत ब्रम्हविंद्या मंदीर परिसरात दरवर्षी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत होते. त्यानंतर दरवर्षी देशभरातील शेकडो सर्वोदयी कार्यकर्ते महात्मा गांधींना अभिवादन करण्याकरीता ऐकत्रीत येत होते. कालांतराने गावातील व परिसरातील नागरीकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि याला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here