

नागपूर : १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक असतानाही राज्यातील तब्बल ८० टक्के वाहने अजूनही जुन्या नंबरप्लेटवर धावत आहेत. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर शासनाने अखेर चौथ्यांदा अंतिम मुदत वाढवत ३० नोव्हेंबर २०२५पर्यंतची मुदत दिली आहे. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी गुरुवारी सर्व आरटीओंना पाठवलेल्या पत्रातून निर्णय जाहीर केला. मात्र, १ डिसेंबर २०२५ पासून ‘एचएसआरपी’ न लावलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.