उद्या गुरुदेव प्रार्थना मंदिराचे उद्घाटन

खरांगणा (मोरांगणा) : नजीकच्या नटाळा येथील सामुदायिक गुरुदेव प्रार्थना मंदिराचे उद्घाटन शनिवारी 28 आँगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून भु. वैकुंठ अड्याळ टेकडी येथील संचालक, प्रबोधनकार सुबोधदादा राहणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खरांगणा पोलिस ठाण्याचे ठाणेदार तर प्रमुख उपस्थिती म्हणून नटाळा येथील सरपंच शिला राऊत, प्रांत सेवाधिकारी वा. ग. वैद्य, सप्त खंजेरी वादक व प्रबोधनकार प्रवीण देशमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासीतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here