नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक! ऑनलाइन 97 हजाराचा धातला गडा

वर्धा : सोशल मीडियाद्वारे फेसबुकमध्ये नोकरीसाठी जाहिरात असल्याबाबत टेलिग्रामची लिंक दिली. सदर लिंक महिलेला रजिस्टर करण्यास सांगून वारंवार रिचार्ज करण्यास सांगून महिलेला 97 हजार 438 रुपयांचा गंडा घालत फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यातील फिर्यादी नसीमा खातून शेख सिद्धीरीस उदीन (30) रा. हरिहर नगर, बोरगाव (मेघे ) यांना बीएसएनएल सीमच्या मोबाईलवर फेसबुकमध्ये नोकरीसाठी जाहिरात असल्याचा मेसेज आला.

सदर महिलेने व्हॉटसअँपवर नोकरीसाठी मेसेज दिल्यानंतर आरोपीने टेलिग्रामची लिंक दिली. त्यानंतर दुस-या दिवशी 20 नोव्हेंबरला महिलेच्या मोबाईलवर लिंक पाठवून रजिस्टर करण्यास सांगितले. रजिस्टर केल्यानंतर महिलेला 200 रुपये पेमेंट करण्यासाठी सांगितले. 200 परत केल्यानंतर पुन्हा 1 हजार पाठविण्यास सांगून तीन हजार रुपये रिटर्न केले. महिलेने 21 नोव्हेंबरला 4.55 मिनीटांनी पुन्हा 3 हजार रुपये रिचार्ज केले. त्यात काही तांत्रिक अडचण असल्याचे सांगून 2 हजार, त्यानंतर 5126, पुन्हा 15 हजार, आणखी काही वेळानंतर 20 हजार, पुन्हा 26 हजार 920 चा रिजार्ज करण्यास सांगितले.

त्यानंतर महिलेला 1 लाख 3 हजार 680 रुपयांचे विड्रॉल करायचे आहे, असे सांगून पुन्हा 39 हजार 999 चे रिचार्ज करण्यास सांगितले. त्यानंतर सदर महिलेला आपली 97 हजार 438 रुपयांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी फिर्यादी नसीमा खातुन शेख सिद्धीरीस उदीन यांच्या तक्रारीवरून अज्ञात ऑनलाइन फोनधास्काविरुद्ध वर्धा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वर्धा पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here