अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण! गर्भधारणा झाल्याने प्रकार उघड; आरोपीला केली अटक

वर्धा : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. पीडितेला आठ महिन्यांची गर्भधारणा झाल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पीडितेने याप्रकरणी रामनमर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीस अटक केल्याची माहिती दिली.

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी १७ वर्षीय मुलगी ही देवळी येथे तिच्या मोठ्या वडिलांकडे जायची. तेथे पीडितेची ओळख अयान म्रतीन शेख (वय २२) याच्याशी झाली. आरोपीने पीडितेशी जवळीक निर्माण करून तिला प्रेमाच्या जाळ्यात फासले. त्यानंतर आरोपीने वर्ध्यात येत पीडितेच्या मैत्रिणीच्या किरायाच्या खोलीवर भेटून तिला लग्नाचे आमिष देत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला.

इतकेच नव्हे तर पीडितेच्या घरी कुणी नसतानाही आरोपी अयान याने पीडितेचे लैंगिक शोषण केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिने दवाखान्यात जात तपासणी केली असता ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. पीडितेने याबाबतची माहिती घरच्यांना दिली असता घरच्यांनी थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार पीडितेने दिली. पोलिसांनी आरोपी अयान शेख याला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here