शॉकप फॉन्डेशन तूटल्याने कार पलटली! पति-पत्नी किरकोळ जखमी

पवनार : वर्ध्यावरुन नागपूरकडे भरधाव वेगात जानाऱ्या कारचा शॉकप फॉन्डेशन तूटल्याने कार रोडलगतच्या डिव्हायडरला धडक देत पलटी झालयाची घटना सोमवार (ता. १) सकाळी ११ वाजताच्या सुमारास पवनार येथील चौकात घडली. या कारमध्ये असलेले पति-पत्नी किरकोळ जखमी झाले.

वर्ध्यावरुन चारचाकी वाहनाने पति-पत्नी नागपूरकडे जात होते दरम्यान पवनार येथे बसस्थानक परिसरात अचानक कारचे शॉकप फॉन्डेशन तूटल्याने कारच्या उजव्या बाजूचा टायर निघाल्याने कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रोडलगतच्या डिव्हायडरला धडक देत पलटी होत काही दुरपर्यंत घासत गेली.

या महामार्गाने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते मात्र नेमकी यावेळी मागाहून किंवा सामोरुन कोणतेही वाहन आले नाही. त्यामुळे कोणत्याच दुसऱ्या वाहनाची धडक या कारला बसली नाही. मात्र कार पलटी झाल्याने कारमध्ये असलेले पति-पत्नी दोघेही दबली होती. परिसरातील नागररीकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही सुखरुप कारच्या बाहेर काढत पलटी झालेली कार उचलून रोडच्या बाजूलाल केली. अपघातात कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

यावेळी नरेश बावणे, आतिश उमाटे, रोहण पाटनकर, सतिश रघाटाटे, दामोधर सुरजूसे, नितेश अवचट, दिलीप रघाटाटे, दत्तू मंगरुळकर, मनोहर पाटील, अनिल झाडे, लक्षमण उमाटे, रोहित वांढळे, अनिल उमाटे यांनी अपघातग्रस्तांना कारमधून बाहेर काढण्यास मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here