बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगरपंचायत निवडणुकीकरीता उमेदवारी दाखल

सेलू : बहुजन समाज पार्टीच्या वतीने वर्धा जिल्हयात 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायत करिता आष्टी पाच, समुद्रपुर चार, कारंजा एक, सेलूत पाच या चारही नगर पंचायत मध्ये उमेदवार दाखल केले.

सेलू नगर पंचायतकरिता प्रभाग एक मधून कल्पना प्रमोद सुर्यवंशी, प्रभाग चार मधून ताराबाई ईश्वर देवरे, प्रभाग पाच मधून राजकुमार ईश्वर देवरे, प्रभाग सहा मधून दिपाली आकाश नंदेश्वर, प्रभाग सोळा मधून दीपक उत्तमराव मुन यांनी उमेदवारी दाखल केली.

यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, अनोंमदर्शी भैसारे जिल्हा महासचिव, ॲड. अभिषेक रामटेके, दिनेश वाणी संघटनमंत्री, विधानसभा प्रभारी अरुण शंभरकर, विपुल बौद्ध, राजेश चन्ने, अनिता पारीसे, विशाल रंगारी विधानसभा महासचिव, शंकर पाणबुडे विधानसभा बी व्ही.एफ.संयोजक, अरविंद पाटील, सुधाकर जूनघरे, सिद्धार्थ नगराळे, आकाश नंदेश्वर, उमेश गवई उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here