महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

पुलगाव : तोडलेले वीज कनेवशन तत्काळ चालू करण्यात यावे व चुकीचे वीजबिल दुरुस्ती करून द्यावे, या मागणीसाठी पुलगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सोमवार 6 डिसेंबर रोजी पुलगाव कार्यालयात ठिय्या मांडला. पुलगाव महावितरणचे अभियंता धामणे यांनी तोडलेले कनेक्शन वीजबिल भरल्याशिवाय जोडणार नाही, असे म्हटल्याने शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

यावेळी शेतकरी संघटना युवा आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी, विभागीय अध्यक्ष शेतकरी संघटना माहिती व तंत्रज्ञान आघाडी पूर्व विदर्भ सचिन डाफे, भाजपा तालुका उपाध्यक्ष देवळी सुनील उपासे, शेतकरी संघटना पुलगाव शहरप्रमुख हनुमंतराव कुबडे, शेतकरी संघटना युवा आघाडीचे पुलगाव विभाग अध्यक्ष प्रफुल्ल झाडे यांच्या नेतृत्वात तोडलेले कनेक्शन चालू होईपर्यंत, शेतकरी इथून उठणार नसून कनेक्शन पूर्ववत करेपर्यंत इथेच बसू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here