गारमेंट्स फॅक्टरीत आग! कपडे जळून खाक; ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान

वर्धा : औद्योगिक वसाहतीतील बरबडी रस्त्यावर असलेल्या गांधीग्राम कॉलेज नजीकच्या सखी गारमेंट फॅक्टरीत शॉर्टसर्किटने आग लागल्याने आगीत साड्या, कापडासह इतर असे एकूण ६७ ते ७० लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी नोंद घेतली आहे.

औद्योगिक वसाहतीत असलेल्या सखी गारमेंटमध्ये रात्री आठ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत शोरुममध्ये ठेवून असलेल्या ड्रेसचे बॉक्स, साडी, ड्रेस मटेरिअल तसेच कापड जळून खाक झाले. गारमेंट्स मालक सुनीता रवी शेंडे यांचे सुमारे ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असून या आगीची नोंद सेवाग्राम ठाण्यात घेण्यात आल्याची माहिती सेवाग्राम पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here