शिवशक्ती मित्र परिवाराच्या वतीने दहेगाव गोंडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन! शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य

0
99

खरांगणा (मोरांगणा) : शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शिवशक्ती मित्र परिवाराच्या वतीने दहेगाव गोंडी येथे करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रिती ताई श्रीराम तर खरांगणा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कुरसंगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून झाले शिवाजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रम स्थळी सेवाग्राम रूग्णालयाच्या डॉक्टरांनी रक्त संकलन करण्याचे काम केले. सदर रक्तदान शिबिराला परिसरातील युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता दहेगाव गोंडी येथील शिवशक्ती मित्र परिवाराचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कुरसंगे, मनीष मसराम, प्रितम इंगळे, अतुल गजभिये, सागर भोसले, अविनाश वाघधरे, शुभम मांडगावकर, अमोल होलगीलवर, निखिल मांडगावकर,संदीप मडावी, शंकर घंटलवार ,उमेश गळहाट,उमेश कैलुके, प्रफुल्ल आमडारे, अनिल कौरती, चंद्रकांत माजरीवर, गजानन वडे, अश्विन पवार,सुयोग बीरे, विकास घोडाम, सागर भेंडे, चेतन चोरे, अतुल भेंडे, श्रीकांत लोहकरे, रितेश मांढरे, संकेत महल्ले, नाझीम शेख, अक्षय उईके, सुनील फरासे, गजानन पारिसे, किशोर प्रजापत्ती, शुभम प्रजापत्ती, अश्विन वानखेडे याच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here