५० फुटाचा हायमास्ट कारवर कोसळला! जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी थोडक्यात बचावले

वर्धा : ‘ देव तारी त्याला कोण मारी’ अशीच काहीशी घटना महाराष्ट्र दिनी वर्धा शहर शेजारील सावंगी (मेघे) शिवारात सायंकाळी घडली. पालकमंत्र्यांचा जनता दरबार आटोपल्यावर वाढदिवसाला उपस्थिती दर्शविण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे हे पत्नीसह कारने अमरावतीच्या दिशेने जात होते. कार सावंगी टी-पॉईंट परिसरात येताच ५० फूट उंचीचा हायमास्ट थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कारवर कोसळला. यात अनिल इंगळे यांच्यासह त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावल्या असल्या तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here