बनावट दस्तऐवज प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगणघाट : बनावट उत्पन्न प्रमाणपत्र काढून नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात 3 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत नत्थू महाकाळकर आणि आदित्य नारायण महाकाळकर यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. तहसील कार्यालयातर्फे अर्जाची पडताळणी करण्यात आली असता अर्जासोबत जोडलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्राचा बारकोड हा पुरुषोत्तम बळीराम बुचके या व्यक्‍तीच्या नावाचा असल्याचे दिसून आले. सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावटी असल्याचे दिसून येत असून डिजिटल स्वाक्षरी देखील बनावट असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नायब तहसीलदार विजय अर्जुन पवार यांनी याबाबतची तक्रार दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here