पवनारमध्ये आज सायंकाळी दत्ताजी मेघे यांच्यावर अंत्यसंस्कार; हजारो नागरिकांची राहणार उपस्थिती

पवनार : विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे काल, रविवारी (दि. २२) नागपूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण विदर्भात शोककळा पसरली असून राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मेघे यांच्या पार्थिवावर आज, सोमवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या दरम्यान पवनार परिसरातील सेवाग्राम रोडवर असलेल्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सावंगी (मेघे) येथे नागरिकांना अंतिम दर्शनाची संधी देण्यात येणार आहे. दत्ताजी मेघे यांनी शिक्षण, आरोग्य आणि समाजकार्यात मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे विदर्भाने एक अभ्यासू, संयमी आणि जनतेशी नाळ जपणारा नेता गमावला आहे. आज सायंकाळी पवनारमध्ये होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाने आवश्यक व्यवस्था केली असून संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here