प्रात्याक्षीकाच्या माध्यमातून जनजागृती ; रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा

वर्धा : ३६व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा व विभागीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने अग्निशमन दल, १०८ रुग्णवाहिका व प्रथमोपचार यांचे संयुक्त प्रात्यक्षिक विभागीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सेवाग्राम रोड वर्धा येथे पार पडले. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मेघल अनासने, यंत्र अभियंता व प्रभारी विभाग नियंत्रण प्रताप राठोड, उपयंत्र अभियंता अनिल अनलेकर, विभागीय वाहतूक अधिकारी गोविंद उजवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

१०८ रुग्णवाहिका टीमने उपस्थित मान्यवर तसेच उपस्थित चालक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. एखाद्या व्यक्तीस जर अचानक अटॅक आला तर त्यावेळेस सीपीआर कसा द्यावा, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास त्याला कशा प्रकारे सहाय्य व हाताळणी करावी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले. अग्नीशमनच्या टीमने उपस्थिति सर्वांना अनावधानाने आग लागल्यास त्यावर कशाप्रकारे नियंत्रण करावे याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले.

यावेळी सर्व माण्यवरांनी अपघात कसे टाळता येतील आणि अपघात झाल्यास त्यावेळी परिस्थीती कशी हाताळावी याची माहिती दिली. हा कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा स्नेहा मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक साधना कवळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक पखान सर, श्री ढोबळे यांनी पार पाडला. यावेळी मेडिकल ऑफिसर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. सचिन खोंड, डॉ. रवि जाधव आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, डॉ. अमोल चापले, डॉ. सुबोध कुरलुके, पवन भगत अग्निशमन दलाचे गौरव शेगावकर, मयूर सोनवणे, सिद्धार्थ मरकवडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here