गुंडासारखी वीज बीलाची वसुली ताबडतोब थांबवा! मित्र परिवार ग्रुपचे अभियंत्याला निवेदन

सिंदी (रेल्वे) : शहरातील महावितरन कंपनी तर्फे चालु विज बीलाच्या भरणा करण्यांची दिलेली मृदत संपण्याअगोदरच गुंड्यासारखे घरावर येत सक्तीने वसुली करणे अथवा लाईन कापण्याची अमानुष कारवाई ताबडतोब थांबवावी अन्यथा मित्र परिवार ग्रुपतर्फे तिव्र आंदोलन करण्याच्या इशार्याची तक्रार येथील महावितरन कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला शनिवारी (ता. २५) देण्यात आली.

कोरोणा महामारीत अनेकाचे रोजगार हिरावले अनेकाना आर्थिक फटका बसला अनेकाचे अशरक्षः कंबरडे मोडले. बंदमुळे हातचे काम गेल्याने अनेकांचे खान्याचे वांदे झाले. परिवाराची जबाबदारी सांभाळताना अशरक्षः दमछाक झाली. अशा परिस्थितीत अनेकानी कसेबसे व्यवहार सांभाळले.

शहरात ८०% शेतकरी आहे मागील वर्षी शेतमालापैकी सोयाबीन एकही पोते झाले नाही तर बोंडअळीच्या प्रकोपाने कापसाचे उत्पादन सुध्दा अल्पच राहले. शेतकर्याची अवस्था बीकट असल्याने शेतमजुरांना सुध्दा याचा फटका बसला यावर्षी पाहिजे त्या प्रमानात मंजुरी उपलब्ध नसल्याने मजुराची आर्थिक कोंडी झाली. अशा बीकट परिस्थितीत शहरातील बहुतेक परिवार कसाबसा उदरनिर्वाह चालवित आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणत्या महीण्याचे वीज बील सुध्दा पटविणे जमायला पाहत नाही. एखाद्यी बील खंडीत झालेल वीज ग्राहक शहरात प्रकर्षाने दिसुन येतात.

मात्र शहरातील महावितरन कंपनी तर्फे चालु विज बीलाच्या भरणा करण्याची मृदत संपण्याअगोदरच सक्तीने वीज बील वसुली करीत असल्याची ओरड शहरातील असंख्य वीज ग्राहक करीत आहेत या असंवेदनशील प्रकाराची शहरातील मित्र परिवार ग्रुपने दखल घेत शनिवारी (ता.२५) ला कनिष्ठ अभियंत्याला तक्रारार वजा निवेदन देत हा प्रकार ताबडतोब थांबवावा अन्यथा आम्ही विज ग्राहकासोबत तिव्र आंदोलन करु असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here