ट्रकचा दुचाकीला कट, चालक जखमी

वर्धा : ट्रकचालकाने भरधाव निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीस्वारास जबर कट मारला. यामुळे दुचाकीस्वार खाली पडल्याने जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळच्या सुमारास भूगाव टी-पॉर्ईंटवर घडला.

सुरेशचंद्र रवींद्रनाथ उपाध्याय (3०) रा. उत्तम व्हॅल्यू कंपनी क्वॉर्टर, असे जखमीचे नाव आहे. ते आपल्या दुचाकीने कंपनीकडून इंझापूरकडे जात होते. यादरम्यान टी-पॉर्ईंटवर भरधाव वेगाने आलेल्या एम.एच. ४० एल. ८६८६ क्रमांकाच्या ट्रक चालकान जबर कट मारला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुूटून दुचाकीस्वाराचा अपघात झाला. यात सुरेशचंद्र यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून, दुचाकीचेही नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here