पतीने झोपेतच केला पत्नीचा खून! शिवाजीनगरातील थरार; पाच वर्षांचा मुलगा प्रत्यक्षदर्शी

यवतमाळ : येथील शिवाजीनमरमध्ये बहिणीच्या घरी पाहुणेपणाला आलेल्या भावाने त्याच्याच पत्नीचा चाकूने भोसकून व नंतर गळा आवळून खून केला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली. या सर्व घटनेचा पाच वर्षांचा मुलगा प्रत्यक्षदर्शी आहे. शिवाजीनगरसारख्या उच्चभू वस्तीत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मेघना रविराज चौधरी (3०) रा. पिंपळगाव ता. पुसद असे मृत महिलेचे नाव आहे. ती पती रविराज रमेज्ञ चौधरी (३५) याच्यासह यवतमाळातील शिवाजीनगर स्थित नणंदेच्या घरी आली होती.

आरोपी रविराज चौधरी हा पिंपळगाव येथे शेती करतो. त्याचा दोन महिन्यापूर्वी अपघात झाला होता. त्यात त्याच्या डोक्याला इजा झाली. त्यासाठी त्याच्यावर काही दिवसांपासून यवतमाळात न्युरो फिजिशीयनकडे उपचार सुरू होते. त्याच्याच अनुषंगाने चौधरी दाम्पत्य बहीण, जावई उमेश ठाकरे यांच्याकडे आले होते. बुधवारी मध्यरात्री मेघना, पती रविराज व पाच वर्षांचा मुलगाअगस्त्य हे एका खोलीत झोपले होते.

मध्यरात्रीनंतर आरोपी रविराजने पत्नीला झोपेतच चाकूने भोसकले. तिच्या पाठीवर, हातावर व पोटावर चाकूने वार केले. नंतर तिचा गळा आवळून खून केला. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. उमेश ठाकरे यांनी घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ घटना स्थळ गाठत आरोपी रविराज रमेश चौधरी (3५) याला अटक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, ठाणेदार मनोज केदारे यांनी भेट दिली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत. उमेश ठाकरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here