इयत्ता 5 ते 12 वी पर्यंतच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद

वर्धा : जिल्हयातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी मोठया प्रमाणावर कोरोना बाधीत होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी इयत्ता ५ ते १२ वी पर्यंतच्या शाळा व महाविद्यालये विद्यार्थ्यांकरीता प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात येणारे शिक्षण बंद ठेवणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष प्रेरणा देशभ्रतार यांनी वर्धा जिल्हयातील इयत्ता ५ ते १२ वी पर्यंतच्या शाळा व महाविद्यालये (वैद्यकीय शिक्षणाशी संबंधीत महाविद्यालये वगळुन) विद्यार्थ्यांकरीता 22 फेब्रुवारीपासून पूढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे.

मात्र सदर कालावधीत ऑनलाईन पध्दतीने शिक्षण चालु राहील. तसेच शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग यांनी नियमितपणे कामकाज सुरु ठेवावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here