शिवीगाळ करताना हटकले! केली काठीने मारहाण

कारंजा (घा.) : शिवीगाळ करण्यास हटकले असता, चौघांनी काठीने मारहाण केली. बोदरठाणा येथे ही घटना घडली. ज्योती गाडगे ही घरासमोर बसली असताना नामदेव पठाणे हा शिवीगाळ करीत होता. दरम्यान, ज्योतीच्या आई व काकूने शिवीगाळ करताना हटकले असता नामदेव पठाडे, सुरेखा पठाडे, कुमकुम पठाणे यांनी शिवीगाळ करीत काठीने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कारंजा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here