ग्रामिण मधुन असलेला विद्यृत पुरवठा शहरातील फिडरवरुन देण्याची मागणी

सिंदी(रेल्वे) : आम्ही शहरातील नगर पालिकेच्या वार्ड क्रमांक एक मधील रहीवाशी असुन आम्हालाच ग्रामिण मधुन विद्यृत पुरवठा का? असा सवाल उपस्थित करून आम्ही शहरात राहुन ग्रामिण लोडशेडिंगचा त्रास का सहन करायचा आम्हाला सुध्दा शहरातुन विद्यृत पुरवठा देण्यात यावे या मागणीचे निवेदन रेल्वे फाटका पलीकडील वार्ड क्रमांक एक मधील रहिवाश्यानी सोमवारी ता. ११ स्थानिक कनिष्ठ अभियंत्याला देण्यात आले.

येथील वार्ड क्र.०१ रेल्वे गेट पलीकडील विद्युत पुरवठा परसोडी ग्रामिण मध्ये सहाय्यक अभियंता व्दारे जबरण देण्यात आलेला आहे रेल्वे गेट पलीकडील वीजग्राहक वेळोवेळी सिंदी(रेल्वे) मधील विद्युत पुरवठा देण्याची मागणी केलेली आहे परंतू कनिष्ठ अभियंता साहेब यांनी सिंदी(रेल्वे) मधील विद्युत पुरवठा अद्यापही दिलेला नाही त्यामुळे ग्रामिण विद्युत भारनियमनाचा ञास सिंदी शहरातील वार्ड क्र.०१ मधील रहीवासी यांना होत आहेत करिता वार्ड क्र.०१ रेल्वे गेट पलीकडील रहीवासी सोमवारी (ता.११) निवेदन देण्याकरिता गेले असता अभियंता साहेब कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे तिथेच कर्तव्यावर असलेले महावितरनचे कर्मचार्‍यांना सामाजिक कार्यकर्ते रंजित मडावी यांच्या नेतृत्वात वार्ड क्र.०१ चा विद्युत पुरवठा परसोडी ग्रामिण न देता सिंदी शहराचा विद्युत पुरवठा पुर्वरत करावा अन्यथा आम्ही तिव्र आंदोलन करू असा गरभरीत इशारा निवेदणातुन देण्यात आला. निवेदन देताना वार्ड क्रमांक एक चे रहिवासी गजानन हांडे, सुरेश मुडे, गजानन येळणे, मनोज गुप्ता, नरेन्द्र लाखे, लक्ष्मण मरस्कोल्हे, नरेश मुडे, चव्हान आदीची उपस्थित होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here