

पवनार : येथील बसस्थानक परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने एकाच रात्री चार ठिकाणी डाव साधत मालमत्ता लंपास केल्याची घटना रविवारी (ता.११) पहाटे उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. चोरीच्या या घटनेत चाय कॅन्टीन चालक सतीश रघाटाटे, सुधाकर बावणे, रवींद्र नगराळे आणि गणेश पाटील यांच्या पानटपऱ्यावर चोरट्याने हात साफ केला.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच भागात रस्त्यावरून फोनवर बोलत चाललेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावून एक दुचाकीस्वार चोर पसार झाला होता. ही घटना अजून ताजी असतानाच आता चार टपऱ्यांवर झालेली चोरी ही सेवाग्राम पोलिसानंपुढे मोठं आव्हान ठरत आहे. नागरिकांनी यावर तात्काळ कारवाई करण्याची आणि परिसरात गस्त वाढवण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.