

वर्धा : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार (ता. २३) रोजी शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रम संपर्कप्रमुख अनंतराव गुढे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, प्रशांत शहागडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी शिवसेना वर्धा शहर शाखेचे वतीने शहर प्रमुख राकेश मंशानी यांचे नेतृत्वात सकाळी शिवसेना पक्ष कार्यालय,धंतोली चौक येथे वंदनिय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दत्तपुर येथे स्टार संस्थेच्या वतीने संचालित रुग्ण महिलांना साडी-चोळी, फळे, व इतर जीवनावश्यक वस्तूचे वाटप वाटप करण्यात येणार आहे. दुपारी सेलू येथे तालुका प्रमुख सुनिल पारिसे, शहरप्रमुख गणेश कुकडे यांच्या वतीने शिवसेना संपर्कप्रमुख अनंतराव गुढे यांचे अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, प्रशांत शहागडकर यांचे प्रमुख उपस्थितीत शितलंदास महाराज मठ येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार तसेच महिला आघाडीच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
पुलगाव येथील कार्यालयात वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शहरप्रमुख नाना माहुरे यांच्या नेतृत्वात व जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर यांचे उपस्थितीत सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय व मुकबधिर विद्यालय येथे फळ वाटप तसेच सायंकाळी ६ वाजता महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू व साडी चोळीचा कार्यक्रम संपर्कप्रमुख अनंतराव गुढे यांचे अध्यक्षतेखाली तर जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, प्रशांत शहागडकर, उपजिल्हा प्रमुख, तुषार देवढे, गणेश इखार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमास शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खुशाल राऊत, बालू वसू, सुनिल पारिसे, गणेश कुकडे,अमित वाचले, श्रीकांत मिरापूरकर यांनी केले आहे.