
अंबाजोगाई : अंबाजोगाई – लातूर रोडवर बर्दापूर जवळ नंदगोपाल डेअरी समोर आज (दि. ०९) सकाळी ८.३० वा. लातूर – औरंगाबाद बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जण जागीच ठार आणि दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



















































