ट्रकचा भीषण अपघात! चालक ठार; क्लिनर गंभीर: केळापूर परिसरातील भीषण अपघात

वर्धा : ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. यात टरकचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात पुलगाव येथून १३ कि. मी. अंतरावर असलेल्या केळापूरजवळ १२ रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास झाला. रवी भास्कर जाधव (२६, रा. मेहेकर, जि. बुलढाणा) असे मृताचे नाव असून, क्लिनर प्रकाश सुखदेव लष्कर हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृत रवी भास्कर जाधव हा एमएच २८ बीबी ०९३३ क्रमांकाच्या ट्रकमध्ये अंगूर भरुन नागपूरकडे भरधाव जात होता. दरम्यान, समोरील वाहनाला ओव्हरटेक करीत असतानाच नागपूरहून पुलगावकडे जाणाऱ्या युपी ६० एटी ५०८० क्रमांकाच्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात रवी भास्कर जाधव याचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश लष्कर हा गंभीर जखमी झाला. पुलगाव पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here