
राहुल काशीकर
पवनार : काही दिवसापुर्वी पवनार शिवारात दोन शिकारी करुन आंजीच्या दिशेने गेलेला तीन वर्षीय वाघ पुन्हा पवनारात परतला आणि शेतकरी गोविंद पाटील यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या गाईची शिकार केली. ही घटना बुधवार (ता. १६) रात्रीच्या सुमारास घडली. श्री पाटील यांच्या शेतातील वाघाने दुसऱ्यांदा ही शिकार केली. याआधीही त्यांच्या शेतातील कालवडाची शिकार याच वाघाने केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात वाघाची दहशत कायम आहे. मात्र वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही त्यामुळे गावकर्यांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
पवनार शिवारात शिकार केल्यानंतर वाघ हा आंजीच्या दिशेने गेल्याची माहिती शेतकर्यांना वनविभागाकडून देण्यात आली होती त्यामुळे शेतकर्यांनी आपली जनावरे शेतातील गोठ्यात नेऊन बांधली मात्र वाघाने पुन्हा पवनारात ऐन्ट्री घेत पुन्हा त्याच गोठ्यातील गाईची शिकार केली त्यामुळे शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काही दिवसापुर्वी आर्वी तालुक्यातील कन्नमवारग्राम येथील तरुन शेतकर्याला वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. पवनार शिवारात या वाघाने आता थान मांडल्याने धोका वाढलेला असून शेतकरी आणि शेतमजूर यांच्यात दहशत निर्मान झाली आहे. मात्र वनविभाक कोणतीही ठोस भुमीका घेताना दिसत नाही. सिसिटीव्ही कँमेरे लावने आणि वाघ तिथेच आहे तिकडे जाऊ नका बस इतकाच सल्ला ते देण्याच काम करीत आहे.


















































