निर्जीव वस्तू अन्‌ दगड कधीही दूध तसेच पाणी पीत नाहीतच! नरेंद्र कांबळे; फसगत करणाऱ्यांवर होते कायदेशीर कार्यवाही

वर्धा : जगात असा कोणताही निर्जीव दगड किंवा निर्जीव वस्तू दूध आणि पाणी पीत नाही. नागरिकांनीही अशा भाकड कथा व घटनेवर विश्‍वास ठेऊ नये. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अथांग प्रयत्नातून जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात अंमलात आला आहे. खोटी बतावणी करून नागरिकांची फसगत करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होते, असे प्रतिपादन म.अंनि.स.चे अध्यक्ष नरेंद्र कांबळे यांनी केले. चमत्काराच्या नावावर फसणूक करणाऱ्यांविरुद्ध ड्रस अँण्ड म्याजिक ऐक्ट नुसारही गुन्हा दाखल करता येतो. याही पलिकडे जाऊन कुणी चमत्काराचे आव्हान स्वीकारत असेल तर त्यांनी आव्हान स्वीकारावे. महाराष्ट्र अंनिसद्वारे एक दगडाची मूर्ती व ग्लासभर दूध मूर्तीला पाजण्यासाठी देण्यात येईल. केवळ अट इतकीच मूर्तीला दूध पाजल्यावर एक थेंबही दूध जमिनीवर पडता कामा नये, असेही कांबळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here