ट्रक, मिनीडोअर, टिप्परचा तिहेरी अपघात! आजनसरा चौरस्त्यावरील घटना; जीवितहानी टळली

वडनेर : तीन दिशेने येणारे ट्रक, मिनीडोर व टिप्पर यांची जोरदार धडक झाल्याने मोठा अपघात झाला. ही घटना मंगळवार 8 मार्च रोजी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर आजनसरा चौरस्ता वडनेर येथे घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसून, ट्रक, मिनीडोर व टिप्परचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रक क्रमांक यूपी 32 एल.एन 9977 हा बैंगलोरवरुन नागपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, आजनसरा चौरस्त्याजवळ चंद्रपूरच्या दिशेने राशन घेऊन येत असलेल्या मिनीडोर क्र. एम. एच. 35 के 0292 ला भीषण धडक देऊन बाजूला उभ्या असलेल्या टिप्पर क्र. एम.एच. 31 सी.क्यू 6442 वर जाऊन आदळला.

यामध्ये तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रॅकचालकाने वेळेवर ब्रेक केल्यामुळे समोर असलेली चहा कॅन्टीनही थोडक्यात बचावली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. येथील चहा कॅन्टीनवर नागरिकांची गर्दी असते. घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सोनपितरे व चमुने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here