दुभाजकावर आदळली भरधाव कार! पाच जण किरकोळ जखमी

वर्धा : सेवाग्रामहून वर्ध्याकडे जाणारी भरधाव कार सूतगिरणी जवळच्यावळण रस्त्यावरील दुभाजकावर आदळून रस्त्याशेजारी असलेल्या वीजखांबाला धडकली. या कारमधील चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरुवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार सेवाग्रामहून वर्ध्याकडे कार क्र. एम.एच. 32 एएच 6737 ने भरधाव वेगाने जात असताना बापुराव देशमुख सूतगिरणीजवळ वळण रस्त्यावर कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावर चढली. पथदिव्याचा खांब पडून समोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीजखांबाला धडकली. यात कारमधील चार ते पाच जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, कारचे मोठे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here