सेलू तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान! तहसीलदार यांच्या हस्ते शुभारंभ

सेलू : महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी हा शासन आदेश नुकताच पारित केला. शासनाच्या या आदेशाची अंमलबजावनी चा शुभारंभ वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आज येथील तहसीलदार महेंद्र सोनोने यांच्या हस्ते करण्यात आला.

वर्धा जिल्ह्यात कोरोणा रुग्णाचा आकडा झपाट्याने वाढत असून सेलू तालुक्यात आज पर्यंत एकुण ३०५ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण निघाले असून त्या पैकी २४७ रुग्ण बरे झाले तर ५० रुग्ण उपचार घेत आहे, तर 8 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात सध्या प्रतिबंध झोन निरंक असून गृह विलागिकरण मध्ये ३८ रुग्ण आहे.

महसूल विभाग व तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र यांच्या वतीने आज माझे कुटुंब माझी जबाबदारी या विशेष मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला सदर विशेष मोहीम ही दिंनाक २५ ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण सेलू तालुक्यात राबविण्यात येणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानात विशेष करून नागरिकांनी घ्यायची काळजी या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. तालुक्यात असलेल्या सर्व मंदिर, मजीद, बौद्ध स्थुप येथून सुद्धा माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत नागरिकांनी विशेष करून घ्यावयाच्या काळजीत शुभेच्छा देण्यासाठी नमस्कार करा शारीरिक संपर्क टाळा, स्वतः व इतरांमध्ये कमीतकमी २ मीटर अंतर ठेवा, पुन्हा वापरता येईल अशा मास्क चा वापर करावा, तोंड नाक व डोळ्यांना सतत स्पर्श करणे टाळावे, वारंवार आपले हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवा, तंबाखू जन्य पदार्थाचे सेवन टाळा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, दररोज वापरत येणाऱ्या गोष्टी व पुष्टभाग निर्जंतुक करावा, अनावश्यक प्रवास टाळावा, इतरांशी भेदभावाची वागणूक ठेवू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, चुकीची माहिती इतरांना देऊ नका व अफवांवर विश्वास ठेऊ नये, आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्या असा संदेश या मोहिमेत नागरिकांना देण्यात आला.

ही मोहीम यशस्वी करण्याकरीता महाऑनलाईनचे जिल्हा व्यवस्थापक शाहेजाद शेख, जिल्हा समन्वयक प्रतीक उमाटे, आपले सेवा केंद्र चे तालुका समन्वयक नितीन झाडे आणि तालुक्यातील आपले सरकार चे सर्व व्हींएलई यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here