

वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलिस वेलफेयर विभागाच्या निर्माणाधीन पेट्रोलपंप हटविण्यात यावा याकरीता आंबेडकरी अनुयायी आणि संघटनांचा प्रचंड विरोध होत आहे मात्र याची शासन-प्रशासन कोणतीच दखल घेताना दिसत नसल्याने पेट्रोलपंप हटाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मंत्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध केला.
प्रमोद शेंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटण सोहळ्याला कॉग्रेसचे मंत्री तथा पालकमंत्री वर्ध्यात दाखल झाले होते. याची माहिती मिळताच आंबेडकरी कार्यकर्ते यांनी महिला आश्रम परिसरातून दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा जात असताना त्यांना काळे झेंडे ताखवत पालकमंत्री मुर्दाबादच्या घोषना देत निषेध नोंदविला यावेळी सेवाग्राम पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबंध करीत नजरकैदेत ठेवले.
आंबेडकरी समजाने पेट्रोलपंप दुसरीकडे हलविण्याची मागणी केली आहे, याकरीता गेल्या अनेक दिवसापासून मोर्चे, आंदोलने चालूच आहे. मात्र याची कोणतीही दखल शासन प्रशासन घेताना दिसत नाही. त्यामुळे शासन प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे. यादरम्यान पोलिसांनी मोहन राईकवार, निरज गुजर, विशाल रामटेके, विशाल नगराळे, मनोज कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.