खाद्यतेलाचा वारंवार वापर होऊ शकतो कॅन्सर! अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष : कारवाईस टाळाटाळ, उघड्यावरील पदार्थ धोक्याचेच

चिकणी (जामनी) : वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. असे असतानाही हॉटेल्समध्ये या तेलाचा सर्रास वापर केला जातो. यामुळे असे पदार्थ खाणाऱ्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न निर्माण होऊ शकतात, तरी देखील कोणत्याही हॉटेलमालकावर कारवाई झालेली दिसत नाही. यामुळे हॉटेल्समध्ये खाणे टाळलेलेच बरे, अशा दिवसांत हॉटेल्समध्ये खाणे म्हणजे आजारांना निमंत्रण देणे ठरू शकते. आजकाल हॉटेल्समध्ये खाणे एक प्रकारची फॅशनच झाली आहे.

तेलाचा पुनर्वापर केवळ हॉटेलमध्ये नव्हे, तर अनेक घरांमध्येही होतो. तळण्यासाठी वापरलेले तेल उरल्यानंतर ते अनेकदा फोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरात आणले जाते. हे आरोग्याला घातक ठरू शकते.

रस्त्यावर त खाल्लेलेच बरे

रस्त्यावरील टपर्‍यांवर व हॉटेलमध्ये तेलाचा वारंवार वापर केला जातो. हे ठाळायला हवे. तळणाचे उरलेले तेल वापरणे गुन्हा आहे. असे असले तरी टघरी, हॉटेलमध्ये याचा सर्रास वापर करतात. अर्धे उरलेले तेल वापरून खाद्यपदार्थ तळले जात असल्याने रस्त्यावर न खाल्लेलेच बरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here