पैशाच्या वादातून तिघांनी दोघांना केली मारहाण! पोलिसात तक्रार दाखल

कारंजा (घा.) : हिशेब करण्यास गेलेल्या व्यक्तीशी पैशाच्या कारणातून वाद करीत तिघांनी मारहाण करीत जखमी केले. ही घटना पालोरा येथे घडली. अमित बंडे आणि मोहन डोंगरे, देवा कोचे यांनी हॉटेल सुरु केले होते. अमीत आणि त्याचा मित्र विक्रम चव्हाण आणि मोहन डोंगरे हे तिघे हिशेब करीत असताना गुज्जर जुनी, हरविंदर जुनी यांनी हस्तक्षेप केला.

दरम्यान अमित बंडे याने तुम्ही मधात का बोलता तुमचा याच्याशी संबंध नाही, असे म्हटले असता देवा कोचे, गुज्जर जुनी, हरविंदर जुनी यांनी लाथाबुक्क्यानी तसेच हातातील कड्याने अमित आणि विक्रमला मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी कारंजा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here