शेताच्या धुऱ्याचा वाद गेला विकोपाला! घोराडच्या ‘मधुकर’ची ब्राह्मणीत केली हत्या

सेलू : घोराड येथील रहिवासी असलेल्या मधुकर चिंतामण खराबे (४६) यांची नजीकच्या ब्राह्मणी गाव शिवारात हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळ घडली असून, आरोपींनी शेतीच्या धुऱ्याच्या कारणावरून वाद करून मधुकर यांना बेदम मारहाण केली. अशातच मधुकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.

मधुकर व त्यांच्या कुटुंबीयांत शेतीच्या धुऱ्याच्या कारणावरून वाद होता. मधुकर हा पत्नीसह ब्राह्मणी गावाकडून घोराडच्या दिशेने येत होता. दरम्यान, विरुद्ध दिशेने दुचाकीने अलिल्या तिघांनी मधुकर व मधुकरच्या पत्नीवर हल्ला चढवून लोखंडी रॉडने मारहाण केली. यात मधुकर यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत मधुकरची पत्नी जखमी झाली आहे. माहिती मिळताच, सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. या प्रकरणी सेलू पोलिसांनी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here