ट्रकच्या चाकात येत युवकाचा मृत्यू! आकरे सभाग्रहासमोरील अपघात

वर्धा : ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने ट्रकच्या मागील चाकात येऊन दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आकरे सभागृहासमोर झाला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी ट्रक पोलीस ठाण्यात लावून चालकास ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

यश निनावे (१७) असे मृत युवकाचे नाव आहे. एम. एच. 3२ क्यू २७५९ क्रमांकाचा ट्रक हा आरवींनाकाकडून जुनापाणी चौकाकडे जात होता. दरम्यान,आकरे सभागृहासमोरील रस्त्यावर ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने ट्रकच्या मागून एमएच ४९ एडब्यू ६०३७ क्रमांकाच्या दुचाकीने येणारा यश हा अचानक ट्रकच्या मागील चाकात येऊन जागीच ठार झाला.

रामनगर पोलिसांनी अपघातस्थळी जात पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. तसेच ट्रकचालकास ताब्यात घेत ट्रक पोलीस ठाण्यात लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here