भरधाव कारचे तीन टायर फुटले! वाहन दुभाजकावर चढून उलटले; तीन पलटी घेतल्याने झाला वाहनाचा चुराडा: दोघे गंभीर

वर्धा : नागपूर-यवतमाळ बायपास मार्गावर नागपूरच्या दिशेने भरधाव जात असलेल्या कारचे एकाच वेळी तीन टायर अचानक फुटले. अशातच वाहन अनियंत्रित होत थेट रस्ता दुभाजकावर चढले. हा अपघात इतका भीषण होता, की कारने तीन पलटी घेत कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, कारचा चुराडा झाला आहे. ही घटना सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वर्धा शहरानजीकच्या नागठाणा शिवारात घडली.

एम. एच. ०२ सी. झेड. ४०३१ क्रमांकाची कार यवतमाळवरून नागपूरच्या दिशेने जात होती. भरधाव कार वर्धा शहराशेजारील नागठाणा शिवारात येताच एकाच वेळी कारचे तीन टायर अचानक फुटले. अशातच कार अनियंत्रित होत रस्ता दुभाजकावर चढून तीन पलटी घेत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना कारच्या बाहेर काढून तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले, या अपघातात दोघे व्यक्‍ती गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले असून, जखमींची नावे कळू शकली नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here