

वर्धा : पवनार ते वर्धा महामार्ग लगत टी पॉइंट जवळ असलेल्या पांदण रस्त्यात चिखलाचे साम्राज्य असल्याने वर्धेकडे जात असलेली कार क्रमांक एम एच २० एस ९६७२ ही पाण्याने भरलेला खड्ड्यात फसली.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टी पॉइंट जवळ असलेल्या पांदण रस्त्यात चिखलाचे आणि खड्ड्याचे साम्राज्य असल्याने वाहन चालकांना रस्त्यावरचे खड्डे दिसून येत नाही खड्ड्यात पाणी भरून असल्याने वाहन खड्ड्यात जाऊन फसते. या फसलेल्या कारला पाहण्यासाठी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी गर्दी केली होती.