पत्नीच निघाली पतीची मारेकरी! कौटुंबिक कलहातून थरार; मृतदेहाचे तुकडे करून जाळले: मुलगाही ताब्यात

पुलगाव : येथील हिंगणघाटफैल येथे पत्नीने पतीची निर्दयीपणे हत्या केली. पुरावे नष्ट करण्याकरिता चक्क पतीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते जाळले. कौटुंबीक वादातून हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी मिळाली. ही घटना शुक्रवारी घडली असली तरी त्याविषयी उशिरा उलगडा झाला. मृताचे नाव अनिल मधुकर बेंदले (46) रा. हिंगणघाटफैल, पुलगाव असे आहे. मृतदेहाची तुकडे करून मुलाच्या मदतीने ऑटोमध्ये पुलगाव येथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर (बोधड) या मूळ गावात नेले. तिथे मृतदेहाचे तुकडे जाळण्यात आळे, तर शीर हे पुलगाव येथे फेकले.

मृतकाचे शिर दोन दिवसांपूर्वी पुलगावातील रेल्वेस्थानकाच्या बाजूला एका झुडपात मिळाले होते. पोलिसांनी तपासचक्र फिरवीत एक-एक करून तार जुळवले आणि खुनाचा उलघडा केला. या खुनामागे पत्नीच असल्याचे पुढे आल्याने पोलिसही चक्राबले. हिंगणघाटफैल येथे राहणाऱ्या अनिल बेंदले याला दारू पिण्याची सवय होती, असे कळते. तो आधी गृहरक्षक म्हणून काम करीत होता. मात्र, अलीकडे रोजमजुरीचे काम करायचा. कुटुंबात रोज वादविवाद होत होते. याच रागातून पत्नी मनीषा हिने पती अनिलची हत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पतीच्या मृतदेहाचे तुकडे करून दोन बॅगेत भरले व मुलाला दोनशे रुपयांमध्ये ऑटो भाड्याने करायला सांगितला. याबाबत चालकाला काहीही माहिती नव्हती. ऑटोने मृतदेहाचे तुकडे 10 किमी अंतरावर असलेल्या मलकापूर (बोदड) या मूळ गावात आणून जाळले. प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शैलेश शेळके, राजू हाडके, खुशालपंत राठोड, संजय पटले, पंकज टाकोणे, महादेव सानप, शरद सानप, मुकेश वांदिले पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here